मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून नेमके उमेदवार किती याची माहिती हाती लागली आहे. मनसे ५२ जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत ४९ उमेदवारांना अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवण्यात येणार आहे. आजही काही जणांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार तर इच्छुकांची मनधरणी केली जाणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र (ठरक्ष ढहरलज्ञशअॅरू-णववहर्रीं ढहरलज्ञशअॅरू अश्रश्रळरपलश) मुंबई महानगपालिकेची निवडणुक लढवणार आहे. मुंबई महानगरपालिकेत २२७ साठी मतदान होणार आहे. यामध्ये मनसेला ५२ जागा निश्चित झाल्या आहेत. तर आतापर्यत १३५ एबी फॉर्म ठाकरे शिवसेना गटाने दिले आहेत. अजूनही एबी फॉर्म दिले जात आहेत. ठाकरे शिवसेना १६० ते १६५ एबी फॉर्म देणार असल्याचा कळतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी १० ते १२ जागा सोडणार आहे. दरम्यान, मुंबईत भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कडवी झुंज देण्यासाठी ठाकरे बंधूंनी कोणाकोणाला संधी दिली, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी मिळाली, याची संपूर्ण यादी समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.















